आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव वाहनाच्या धडकेत चहा टपरीचालक तरुण ठार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना रस्ता ओलांडताना अमरप्रीत चौकाकडे जाणाऱ्या सुसाट वाहनचालकाने सुनील प्रल्हाद काळे (३१) या तरुणाला उडवल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर तो चहाची टपरी चालवून कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळत होता. हा अपघात रविवारी सकाळी घडला.

एसएफएस शाळेजवळ त्याची चहाची टपरी होती. ताे नेहमीप्रमाणे रविवारीही कामानिमित्त बाहेर गेला. बाफना ज्वेलर्ससमाेरून ११ वाजता पायी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येण्यासाठी रस्ता ओलांडत हाेता. मात्र, सिडकोकडून जाणाऱ्या वाहनाने त्यास उडवल्याने तो लांब फेकला गेला. त्याला स्थानिकांनी घाटीत दाखल केले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी १ वाजता मृत घोषित केले. जवाहरनगरचे निरीक्षक संतोष पाटील, फौजदार दिलीप बसाने, चंद्रकांत पोटे यांनी घटनास्थळी गेले.

सुनील घरात मोठा होता, आता आर्थिक घडीच विस्कटली कुटुंबात सुनील मोठा असून, जिन्सीतील संजयनगरच्या गल्ली क्रमांक बी १ मध्ये राहत होता. वडिलांचे निधन झाले. आई, लहान भाऊ, एक अंध बहीण असून एका बहिणीचे लग्न झाले आहे. ताे चहाच्या टपरीसोबत काही दिवसांपूर्वी भाजीपालादेखील विकत असल्याचे बसाने यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...