आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:घराच्या वादातून पोलिसाने केली तरुणीला मारहाण, पीडितेचा टॉवेलने आवळला गळा

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या वादातून एका पोलिसाने पंचवीस वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली. ही घटना पुंडलिकनगरात घडली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी भगवान त्र्यंबक वाघ, त्याची पत्नी व मुलगा ऋषिकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी आईसोबत गल्ली क्रमांक सातमध्ये राहते. घराच्या ताब्यावरून त्यांचा वाघ कुटुंबाशी वाद सुरू असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुलीची आई ११ मे रोजी नाशिकला गेल्याने ती घरी एकटीच होती. तेव्हा रात्री आठ वाजता वाघची पत्नी तीन महिलांना घेऊन तिच्या घरी आली अन् तरुणीला मारहाण सुरू केली. ‘कुठे दिसली तर मारून टाकू,’ असे धमकावले. स्थानिकांनी धाव घेत तरुणीची सुटका केली. १२ मे रोजी सकाळी पोलिसांत तक्रार देऊन तरुणी घरी पोहोचली असता घरात आधीच भगवान वाघ, त्याची पत्नी व मुलगा बसलेले होते. ऋषिकेशने तिच्या अंगावर धावून जात तेथे पडलेल्या टॉवेलने तिचा गळा आवळला.