आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्न मोडल्याने तरुणीचे छायाचित्र केले व्हायरल

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरपुडा झाल्यानंतर तरुणीच्या कुटुंबाने दुसरीकडे लग्न ठरवल्याचा राग मनात धरून एका तरुणाने दोन वर्षांनंतर तरुणीचे फोटो व्हायरल केले. आरोपी संदीप सराफ नावाने प्राेफाइल सुरू करुन हा प्रकार सुरू केला होता. शुक्रवारी ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २२ वर्षीय नेहा (नाव काल्पनिक आहे) कुटुंबासह फुलंब्रीत राहते.

दोन वर्षांपूर्वी कुटुंबाने तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले. सर्वांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. मात्र, काही कारणांमुळे नेहाच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले. काही महिन्यांतच दुसरीकडे लग्नदेखील झाले. मात्र, डिसेंबरमध्ये फेसबुकवर अचानक नेहाचे फोटाे व्हायरल होत असल्याचे कुटुंबापर्यंत पोहोचले. हा प्रकार संदीप सराफ नावाच्या प्राेपुाइल वरुन केला असावा, असा संशय नेहाने तक्रारीत व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...