आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीबाबत २४ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला हाेता. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना नव्याने कर्ज द्यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, कर्जमाफीची अंमलबजावणी झाली आहे. मात्र, तुमच्याकडे अशी प्रकरणे आल्यास आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
रघुनाथ पाटील यांच्यासह आपचे पदाधिकारी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी हजर नसल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्याचे सांगण्यात आले. पण तहसीलदारही हजर नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी येईपर्यंत पदाधिकाऱ्यांनी तासभर वाट पाहिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी विभागीय कार्यकारिणी सदस्य सदाशिव पाटील, मोहंमद बशीर, सुनील भालेराव, मेघा राईकवार, सहसचिव संजय नांगरे, आशा सावळे, ज्ञानेश्वर बोरसे, जनार्दन साबळे, हरिदास सराटे, कांचन बनसोडे, आशिष शिसोदे, अंकुश आगे, रामभाऊ पाटेकर, पाशा खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.