आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तात्काळ उपययोजना करा:आम आदमी पक्षाने महापालिका आयुक्तांना घातले साकडे

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. असे असतांना डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन साकडे घातले.

पावसामुळे छोटी खड्डे झाली मोठी

जागोजागी पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहते. मुख्यतः एन-9 हडको सिडको, संजय गांधी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर तळी साचली आहे. स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे येथे ताबडतोब धूर फवारणी करावी, नाले व घनकचरा साफसफाईचे कामे महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ करण्यात यावी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे खड्डे बुजवून घ्यावीत. जेणेकरून त्यात वाहने जावून आदळणार नाहीत. चळणी झालेल्या रस्त्यामुळे वाहन खराब होणे व नागरिकांना मणक्याचे त्रास सुरू झाले आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचे स्वागतही करण्यात आले. चौधरी यांनी समस्या सोडवण्याचे ग्वाही दिली.

समस्या सोडवण्याची दिली ग्वाही

जिल्हा सचिव संजय नागरे, प्रवीण हिवाळे, प्रशांत इंगळे, ख्वाजा किस्मतवाला, जिल्हा युवा अध्यक्ष आशिष सिसोदे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अतुल निकम, युवा शहराध्यक्ष अभिषेक सात्रळकर, दीपक ढगे, नासीर खतीब, बालकृष्ण कदम, अमोल पाटणी, अझहर खान, सुरेंद्र कुमार, नागरिकांचा प्रमुख सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...