आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरिटेज मॅरेथॉन:आरती झंवर, रामेश्वर मुंजाळ ठरले मॅरेथॉन चॅम्पियन ; एक हजारांपेक्षा अधिक धावपटू धावले

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौलताबादच्या निसर्गरम्य घाटात पहाटे बाेचऱ्या थंडीत एक हजारांपेक्षा अधिक धावपटू धावले. औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित तिसऱ्या एमआयटी हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २५ किमी गटात महिलांमध्ये आरती झंवर, तर पुरुष गटात रामेश्वर मुंजाळने विजेतेपद पटकावले. दौलताबादच्या घाटातील दरवाजाजवळून १० किमी, २१ किमी व २५ किमी अशा तीन गटांत ही मॅरेथॉन सुरू केली. त्याचे उद्घाटन सहकारमंत्री अतुल सावे, स्पेशल आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना, एमआयटीचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे, संजीव ऑटोचे संजीव तांबोळकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून केले.

रेस डायरेक्टर म्हणून ज्येष्ठ मॅरेथॉनपटू व्यंकट यांनी काम पाहिले. मॅरेथॉनमधील विजेत्यांना दोन लाखांची बक्षिसे दिली. धावपटूंकडून प्रथम वॉर्मअप करवून घेण्यात आला. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या निनादात धावपटूंचे स्वागत केले. इलेक्ट्रिक दुचाकीवर पायलट तैनात होते. जागोजागी मार्गदर्शक फलक, पायलट गाड्या, पाणी, बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट, संत्री, सहा वॉटर स्टेशन होते. त्या प्रत्येक ठिकाणी डॉक्टर, कार्यकर्ते हजर होते. विविध ठिकाणी चार सुसज्ज कार्डियाक अॅम्ब्युलन्सही होत्या.

बातम्या आणखी आहेत...