आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'एसआयपी' अबॅकस इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाऊंडेशन 'लेव्हल थ्री'मध्ये ईशान मनीष वीर याने दुसरा क्रमांक पटकावला. यासह तो स्पर्धेत 'बेस्ट परफॉर्मर' पुरस्काराचाही मानकरी ठरला.
चेन्नईच्या नंदमबक्कम ट्रेड सेंटर येथे शास्त्रज्ञ आणि सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजराजन यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
साडेतीन हजार विद्यार्थी
ईशान अग्रेसन विद्या मंदिरचा चौथीचा विद्यार्थी असून त्याला मास्टरमाइंड अबॅकस क्लासच्या राधा बजाज यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ६ ते १४ वयोगटातील ३ हजार ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये झाली.
एकूण तीनशे प्रश्न
विद्यार्थ्यांना ११ मिनिटांत गणिताचे ३०० प्रश्न सोडवायचे होते. ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना गणितातील ज्ञान विकसित करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे,असे राजराजन म्हणाले. 'एसआयपी' अकादमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर यांनीही मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल. त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल असे सांगितले.
असा आहे पुरस्कार
प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. ईशानच्या यशाबद्दल त्याचे संपूर्ण कुटुंब, शाळेचे मुख्याध्यापक संतोष करवा आणि वर्गशिक्षिका सविता अरबोले आणि मास्टरमाइंड क्लासने अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.