आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आरोपी अटकेत:गुप्तधनाचे आमिष दाखवून ५५ हजारांची फसवणूक करणाऱ्या ज्योतिष्याचे अपहरण; गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेत केली चार तासांत सुटका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत: पायाळू असल्याचे सांगून ज्योतिषी किशोर कांतीलाल कोंडेकर (५३) यांनी ५५ हजारांमध्ये गुप्तधन काढून देण्याचे आमिष तीन तरुणांना दाखवले. नोव्हेंबर महिन्यात या तिघांनी त्याला ५५ हजार रुपये दिले. मात्र, तरीही गुप्तधन काही मिळाले नाही. अखेर अभियंता असलेला शिवाजी किसन नवाते (३२, रा. छावणी), मच्छिंद्र रामकिसन आगलावे (३०, रा. बिडकीन) आणि रवी सुंदरलाल हनुते (२९, रा. पदमपुरा) यांनी कोंडेकर व त्यांच्याकडे काम करणाऱ्या वैभव लहाने (२२) याचे अपहरण केले.

गुन्हे शाखेला ही बाब कळताच त्यांनी चार तासांत कोंडेकर यांची सुटका केली, तर त्यांचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली. देशमुखनगरमधील कासलीवाल इस्टेटमध्ये राहणारे कोंडेकर ज्योतिषी आहेत. वैभव त्यांच्याकडे संगणकावर काम करताे. सहा महिन्यांपूर्वी कोंडेकर वैभवला घेऊन गजानन महाराज मंदिराजवळ गेले होते. तेव्हा शिवाजी व त्याच्यासेाबतच्या मित्राने त्यांना ५५ हजार रुपये देऊ केले.

३१ मे रोजी वैभव त्यांच्याकडे असताना सकाळी अकरा वाजता दोन जण तेथे दाखल झाले. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच त्यांनी कोंडेकर यांना मारहाण करत दुचाकीवरून बसवून पडेगाव स्मशानभूमीत नेले. तेथे वैभवने मात्र पैसे आणण्याचे आश्वासन देत स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर तत्काळ नियंत्रण कक्षाला फोन केला. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटना कळताच सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना रवाना होण्याचे आदेश दिले. सतीश जाधव, संतोष सोनवणे, विलास मुठे, नितीन देशमुख यांनी तपासाचे चक्रे फिरवून आरोपींना अटक केली. तपास अधिकारी उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी शिवाजी, मच्छिंद्र, रवीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पैसे परत मिळत नसल्याने चुकीचा मार्ग
पथकाने तांत्रिक तपास सुरू करताच अभियंता असलेला शिवाजी पडेगावमध्ये असल्याचे समोर आले. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या तिघांनी कोंडेकरला अंधारात सप्तशृंगी मंदिराच्या मागील परिसरात बसवल्याचे कळले. पोलिसांच्या पथकाने तिथे जात कोंडेकर यांची सुटका केली. त्यानंतर तिघांना अटक केली तेव्हा मात्र खरा प्रकार समोर आला.

कोंडेकर म्हणतात, अनेकांना गुप्तधन दिलेय
सिव्हिल अभियंता असलेले शिवाजी व इतर दोघे कोंडेकर यांच्याकडे गुप्तधनासाठी गेले होते. जालना, पडेगावमध्ये गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून कोंडेकरने त्यांच्याकडून ५५ हजार रुपये घेतले. मात्र, नंतर दोन्ही दिले नाही. वारंवार पैसे मागूनही पैसेदेखील परत भेटत नसल्याने त्यांनी अपहरणाचा घाट घातला आणि थेट पोलिस कोठडीत रवानगी झाली. कोंडेकर यांनी पोलिसांना, मी अनेकांना गुप्तधन काढून दिलेय, असा दावा केला.

बातम्या आणखी आहेत...