आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यस्तरीय निंबध स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विजेत्यानां पारितोषिक व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. तसेच शिक्षक - शिक्षिका मध्ये उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्यां तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, मनपा उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सोफी लईक अहेमद, पैठण नगरीचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, मुख्याध्यापक संघाचे शिक्षक युनूस पटेल, प्राचार्य डॉ.सय्यद नईम, माजी नगरसेवक शेख बाबू, जगदीश बेदवे आदींची उपस्थिति होती. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने तर कार्यक्रमाची सांगता(शेवट) राष्ट्रगीत गायन करून झाली.
प्रथम ईद मिलाद नबी निमीत्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील अनुक्रमाने प्रथम, द्वितीय अणि तृतीय विजेत्यांना एक पुस्तक, शानदार ट्राफी, सन्मान पत्र व रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच या वर्षी दोन प्रोत्साहनपर बक्षिसे अनुक्रमे देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार 2022 राज्यातून 4 शिक्षकांना देण्यात आले. तसेच 9 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप करण्यात आले. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांना मान्यवराच्या हस्ते शानदार ट्राफी, सन्मान पत्र एक पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे हा सोहळा थाटात उत्साहात पार पडला,कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सय्यद अब्दुल रहीम यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर तर
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले प्रत्येक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. तसेच शिक्षकांनी आपली जबाबदारी खंबीरपणे पाळावी. अशा सूचना केल्या. तर शिक्षक आमदार विक्रम काळे, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
संघटना शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य 9 वर्षापासून करत आहे. आभार प्रदर्शन शफिक पठाण यांनी केले. या कार्यक्रमामध्ये शिक्षक -शिक्षिका, मित्र परिवार तसेच शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यशस्वितेसाठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर ,शफीक पठाण, सय्यद ताजीम, अमोल कुळकर्णी, ॲड. इरफान खान, सय्यद अब्दुल रहीम, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, शेख अलीम,शाहीन नाज,सबा खान, सायमा नाज, शेख जुनेद, फैसल खान अहेमद, आदिनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.