आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री सत्तार प्रकटले:वादग्रस्त वक्तव्यानंतर आज औरंगाबादमध्ये घेतली बैठक; पीकविमा कंपनीला 5 दिवसांत सर्वेक्षणाचे आदेश

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही अनेक दिवसांपासून कृषीमंत्री अब्दूल सत्तार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असे असताना अब्दूल सत्तार हे गुरुवारी (10 नोव्हेंबरला) विभागीय आयुक्तालयात दाखल झाले. यावेळी राज्याची पीक विमा कंपनीचा आढावा त्यांनी घेतला.

सत्तारांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पीक विमा कंपनी यांचा व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सत्तार आज या बैठकीच्या निमित्ताने प्रकटले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले. संपूर्ण राज्यभर हे चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात 31 लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

नुकसान भरपाई मिळावी

सत्तार यांनी सांगितले की, राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिृष्टीमुळे तसेच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकत्यांना मदत मिळावी यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तर कंपनीवर कारवाई

सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना एक हजार पेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणताही शेतकरी असो त्याला त्याचे नुकसान झाले असल्यास त्याला भरपाई मिळायला हवी. त्याचे पालन नाही झाल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विभागीय आयुक्तालयमध्ये अजूनही बैठक सुरू आहे. जिल्हा निहाय आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये मराठवाडा विभागाचा आढावा सादरीकरण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर करणार आहेत. यामध्ये मराठवाडा सर्व जिल्हाधिकारी बैठकीत हजर आहेत.

बातम्या आणखी आहेत...