आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अब्दुल सत्तारांची खडसेंना ऑफर:एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत, त्यांनी शिवसेनेत यावे, मी मध्यस्ती करेन

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे - अब्दुल सत्तार

माजी मंत्री एकनाथ खडसे भाजप पक्षावर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखवली आहे. आता शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी एकनाथ खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यावे. आम्ही त्यांचे स्वागत करु. त्यासाठी मी मध्यस्ती करेन, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

सत्तार म्हणाले की, राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत. एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांचे भवितव्य चांगले आहे. आता खडसेंनी शिवसेनेत यावे. आम्ही त्यांचे स्वागत करु. त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोलू. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल.”

0