आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठे खोके अब्दूल सत्तारांना मिळाले:खोके बॅंकेत कुणाच्या नावावर आले ते बाहेर काढण्याची गरज - अंबादास दानवेंचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात मोठे खोके अब्दुल सत्तार यांना मिळाले आहेत. सत्तार गद्दारांचे महामेरू आहेत. ते बॅंकेत कशा पद्धतीने आले, कुणाच्या नावावर आले ते बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिला. त्यांचा एक व्हिडीओही याबाबत जारी झाला आहे.

सत्तार गद्दारांचा महामेरू

अंबादास दानवे म्हणाले, स्वःतच्या घरातील लोक सीईटी घोटाळ्यात असताना उजळ माथ्याने हे मंत्री सर्वत्र बडबड करीत फिरत आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, स्वःतचे खाते, कृषी विभागाकडे लक्ष नाही.अपक्ष लढले आहेत. काॅंग्रेसकडे गेले, भाजपकडे घेत नव्हते म्हणून शिवसेना पक्षात गेले. आता हे गद्दारांकडे गेले. ते गद्दारांचा महामेरू आहेत.

ते हिंदुत्ववादी होत नाहीत

अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार महाराष्ट्रात बडबड करीत फिरत आहेत. मागच्यावेळी त्यांनी हनुमानाचा अनादर केला होता. कट्टर हिंदुत्वाची भाषा बोलतात पण ते हिंदुंना त्रास देतात. ते ज्या हिंदुंना सोबत घेऊन फिरले त्यामुळे ते हिंदुत्ववादी होत नाहीत. त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...