आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवंती, जर्बेरा, निशिगंध, मोगरा, साई गुलाब, ऑर्चिड, ऑस्टर्स शेवंती अशा जवळपास १५ प्रकारच्या ३ क्विंटल फुलांचा अभिषेक इस्कॉन मंदिरातील जगन्नाथाला रविवारी (८ जानेवारी) केला जाणार आहे. अडीच ते तीन फुटांच्या जगन्नाथ, सुभद्रा, बलराम आणि सुदर्शन मूर्तींना फुुलांची आकर्षक वेशभूषा आणि दागदागिने करण्यासाठी ३०० भाविक १० तास काम करणार आहेत. वरुड फाटा येथील मंदिरात सायंकाळी ६ वाजता अभिषेक होणार आहे.
सहा वर्षांपासून इस्कॉन मंदिरात भगवंताचा पुष्प अभिषेक सोहळा केला जाताे. यामध्ये मोसमातील विविध प्रकारची आणि रंगांची फुले वापरली जातात. जवळपास ८० हजारांची फुले यासाठी पुणे, जळगाव, जालना येथून आणली जातात. या सोहळ्यात चारही मूर्तींना फुलांची आकर्षक वेशभूषा केली जाईल. यानंतर मंचदेखील फुलांनीच सजवला जाईल. शेवटी पुष्प अभिषेक फुलांच्या पाकळ्यांनी केला जाईल. “हरे कृष्ण’ कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. छप्पन भोग, संध्याआरतीनंतर मुंबईचे डॉ. गोपालकृष्ण प्रभू भाविकांना मार्गदर्शन करतील.
१५ प्रकारची फुले, आफ्रिकन ड्रम, महिनाभरापासून तयारी झेंडू, शेवंती, गुलाब, बिजली, निशिगंध, कुंदाकळी, केवडा, ऑर्किड, गलांडा, जरबेरा, लिली, साई गुलाब, ऑस्टर्स शेवंती, चांदीपाट, माेगरा अशी किमान ३ क्विंटल फुले मागवली आहेत. १० भक्तांचा चमू मृदंग, टाळ, पेटी, बासरी अशा पारंपरिक आणि आफ्रिकन ड्रम, झांज अशा आधुनिक वाद्यांच्या साथीने कीर्तन करील.
प्रभूची उत्पत्ती त्यालाच अर्पण या मोसमात सर्वाधिक फुले फुलतात. संपूर्ण सृष्टीचा रचयिता परमेश्वराला त्यानेच निर्माण केलेली फुले अर्पण केली जातात. शेतीत पिकणारी प्रत्येक गोष्ट देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. प्रेमप्रददास प्रभू, इस्कॉन
महिनाभरापासून सुरू होती तयारी महिनाभरापासून चार ठिकाणाहून विविध रंगाची फुले खरेदीसाठी तयारी केली आहे. उत्सवाच्या एक दिवसाआधीच जाऊन भाविक ताजी फुले घेऊन येतात. रुख्मिनीप्रिय रमण प्रभू, इस्कॉन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.