आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव साजरा:इस्कॉनच्या राधाष्टमी महोत्सवात पंचगव्याचा अभिषेक, 250 भाविक सोहळ्यास उपस्थित

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या श्वासांत श्याम आहे. राधेच्या ध्यासात श्याम आहे’ आणि म्हणूनच दुनियेच्या मुखात राधाकृष्ण नाम आहे’ कृष्णाच्या नावाआधी राधेचे नाव घेतले जाते. म्हणूनच इस्कॉनमध्ये श्रीकृष्ण जन्माइतकेच महत्त्व राधाष्टमीला देऊन उत्सव साजरा करण्यात आला. २५० भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राच्या वतीने वरुड काजी येथील नवीन वास्तूत उत्सव साजरा केला. नवनिर्माणाधीन मंदिराच्या वास्तूत हा पहिलाच राधाष्टमी उत्सव होता. जगन्नाथजींच्या दर्शनाने आणि ‘हरेकृष्ण’ महामंत्राच्या जयघोषात उत्सव झाला. या वेळी डॉ. गोपालकृष्ण प्रभू यांच्या हस्ते पवित्र मंत्रोच्चारात पंचगव्य तसेच विविध फळांच्या रसाने महाअभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर भगवंतांना छप्पन भोग अर्पण करण्यात आला. डॉ. रोहिणीप्रिय प्रभू यांनी ‘राधाष्टमी’ची कथा सांगितली. राधा म्हणजे त्याग, समर्पणाची प्रतिमा आहे, असे त्यांनी सांगितले. ऑनलाइन स्पर्धांचे निकाल या वेळी घोषित करण्यात आले.

नामसंकीर्तनात रंगले भाविक : या वेळी महाआरती केली. एक तासाच्या या उत्सवात भाविक राधेकृष्ण आणि हरेकृष्णाच्या नामात तल्लीन झाले. मृदंग, करताल, संवादिनी अशा विविध वाद्यांच्या साथीने भजन सोहळा रंगला. शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...