आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरती:साई टेकडीच्या मंदिरात 1 लाख पंचमुखी रुद्राक्षांचा अभिषेक ' आज कार्तिकी पौर्णिमा सोहळा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साई वृंदावन पंचगुरूधाम प्रतिष्ठानच्या वतीने कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (७ नोव्हेंबर) साई टेकडीवरील साईबाबा मंदिरात १ लाख रुद्राक्ष अभिषेक होणार आहे. या वेळी १ लाख बेल अर्पण करून महाआरती केली जाणार आहे. दीड लाखाच्या घरात किंमत असलेले रुद्राक्ष भाविकांना प्रसाद रूपातही दिले जातील.

देवळाई परिसरातील साई टेकडीवर सोमवारी सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजा होईल. यानंतर सकाळी १० वाजता एक लाख रुद्राक्ष अभिषेक आणि एक लाख बेल पान अर्पण करण्यात येणार आहे. कामेश्वरराय कोंडुरी महाराज रुद्राक्ष अभिषेक करतील. काशीहून आणण्यात आलेले रुद्राक्ष पंचमुखी आहेत. अभिषेक पूजनासाठी पंचमुखी रुद्राक्षांची विशेष उपयुक्तता असते. पहिल्यांदाच साई मंदिरात अशा प्रकारे अभिषेक केला जात आहे. मंगळवारी ( ८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता भजन होणार आहे. त्यानंतर १२ वाजता कामेश्वरराय कोंडुरी महाराज यांच्या हस्ते महाआरती होईल.

भागवताचार्य सचिन महाराज ढोले यांच्या कीर्तनाला १२.३० वाजता सुरुवात होईल. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय सिरसाठ, प्रबोधन मुळे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विनायक हिवाळे पाटील, विजय साळवे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाजीराव हिवाळे, अप्पासाहेब हिवाळे, राजेंद्र कानडे, कुलदीप पवार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...