आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरविकास मंत्रालयातून औरंगाबाद मनपात नगररचना उपसंचालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यास माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विरोध दर्शवला आहे. ही नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.बांधकाम परवानगीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या नगररचना विभागात शिपाई म्हणून काम करणाऱ्यालाही प्रचंड महत्त्व असते. त्यात नगररचना उपसंचालकपद तर अत्युच्च मानले जाते. त्यामुळे या पदावर मनपात कार्यरत मूळ अभियंताच असावा, असा बहुतांश पदाधिकाऱ्यांचा आग्रह असतो.
आता घोडेले यांनी थेट प्रधान सचिवांनाच पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, मंजूर सेवा भरती नियमात उपसंचालक नगररचना हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद आहे. प्रतिनियुक्तीने पद भरताना त्याच संवर्गातील अधिकाऱ्याची नेमणूक करणे अपेक्षित असते. तरीही मनोज गर्जे यांना ११ महिन्यांसाठी तात्पुरती तदर्थ नेमणूक देण्यात आली. हे पद शासकीय आस्थापनेवरील आहे, असे दाखवून मनपात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. म्हणून नियुक्ती मागे घ्यावी. पत्राची प्रत मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनाही देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.