आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कोरोना काळात गैरहजेरी, ५ वैद्यकिय अधिकाऱ्यांसह ९ जणांचे वेतन कपातीचे आदेश, शासकिय रुग्णालयाने उचलले कडक पाऊल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही गैरहजर आढळून आलेल्या ५ वैद्यकिय अधिकाऱ्यांसह ९ जणांच्या वेतन कपातीचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी काढले आहेत. या शिवाय त्यांना तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाचा कारभार मागील काही दिवसांपासून अलबेल झाला होता. कोरोनाच्या काळात दिलेल्या कर्तव्यावर काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे अनेकांनी कानाडोळा केला होता. तर काम करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांवरच कामाजा बोझा टाकला जाऊ लागला होता. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनीही या संदर्भात आरोग्य प्रशासनाकडे विचारणा केली होती.

त्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी सोमवारी ता. १७ रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थिती पटाचीही पाहणी केली. यामध्ये पाच वैद्यकिय अधिकारी व चार कर्मचारी गैरहजर असून त्यांची उपस्थिती पटावर स्वाक्षरी नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे डॉ. श्रीवास यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ. केदारनाथ रोडगे, डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. संतोष नांदुरकर, डॉ. एस. एन. गिरी, डॉ. डोणेकर यांच्यासह योगाचार्य शुभांगी कदम, सुरेशनी ढवळे, सविता वाकळे, सुविधा खिल्लारे यांचे ज्या दिवशी उपस्थिती पटावर स्वाक्षरी नसेल त्या दिवसाचे वेतन कपातीचे आदेश काढले आहेत. या शिवाय त्यांना गैरहजेरीबाबात खुलासा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. खुलासा असमाधानकारक असेल तर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

दरम्यान, उशीरा का होईना रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे रुग्णालयाचा कारभार सुधारण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...