आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:नगररचना विभागाच्या संचालकांना शिवीगाळ; 15 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश भालचंद्र पाटील (५४) हे शासकीय कार्यक्रमासाठी शहरात आले असता त्यांना शहर विकास आराखडा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अडवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मानहानीकारक घोषणाबाजी केली. त्यामुळे पाटील यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अध्यक्ष राधाकिसन पंडित, गुरुमितसिंग गिल व अन्य १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेल प्रेसिडेंट पार्क येथे नगररचना विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलनाचे आयाेजन केले होते. ३१ जानेवारी रोजी पाटील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्री ११ वाजता काम आटोपून हॉटेलच्या बाहेर निघाले तेव्हा आरोपी पंडित व इतरांनी त्यांची गेटवरच अडवणूक केली. त्यानंतर तुमच्या विभागाचे सहायक संचालक सुमेध खरवडकर यांची बदली का करत नाहीत? असे म्हणत शिवीगाळ करून अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी केली. पाटील यांनी त्यांना शांततेत निवेदन द्या, शांत व्हा, असे समजावून सांगत असतानाही रात्री आरोपींनी खरवडकर यांना आता बदली करा, नसता तुम्हाला जाऊ देणार नाही, असे धमकावले. उपनिरीक्षक आत्माराम घुगे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...