आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत दोन दिवसांपूर्वी लाच प्रकरणात कारवाया झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात लाच लुचपत विभागाच्या जालना युनीटने मोठी कारवाई करीत जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना ताब्यात घेतले. ही कारवाई आज महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद कार्यालयासमोर करण्यात आली. विशेषतः जालन्यातील युनीटने औरंगाबादेत कारवाई केली.
एसीबीकडून प्राप्त माहीतीनुसार, ऋषीकेश प्रल्हादराव देशमुख (वय 34) असे लाच घेणाऱ्या संशयित अधिकाऱ्यांचे नाव आहे. ते उपविभागीय जलसंधारण अधिकारी वैजापुर चार्ज - उपविभागिय जलसंधारण अधिकारी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. त्यांच्यासह महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ कार्यालय येथे लिपिक असलेले भाऊसाहेब दादाराव गोरे यांच्यावरही एसीबीने कारवाई केली आहे.
सविस्तर माहीती अशी की, तक्रारदार हे चौडेश्वरी कंट्रक्शन परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधाऱ्याचे गवळी - पिंपळी (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील काम हाती घेतले आहे. या कामाचे देयक (बील) 18 लाख रुपये व गोविंदपुर (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील कामाचे देयक 1 कोटी 19 कोटी रुपये असे एकूण 1 कोटी 37 लाख रुपये देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्यासाठी कामाची टक्केवारी म्हणून 7.5 टक्क्याप्रमाणे 8 लाख 3 हजार 250 रुपये, स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून 50 हजार रुपये अशी एकूण 8 लाख 53 हजार 250 रुपयांची लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज ऋषीकेश देशमूख यांना त्यांच्या वाहनात लाच घेताना पकडले. ही कारवाई महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद कार्यालयासमोर करण्यात आली.
ही कारवाई औरंगाबाद एसीबी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधिक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, जमधडे, बुजाडे, खंदारे गिराम यांच्या पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.