आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत आजपासून पास सिस्टीमला सुरुवात:अपघात विभागात केवळ एकाच गेटने प्रवेश; रुग्णाच्या दोन नातेवाईकांना आतमध्ये प्रवेश

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटी मध्ये गुरुवारपासून पास सिस्टीमला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण आणि त्याच्या दोन नातेवाईकांना आत मध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी प्रवेशद्वाराजवळच अपघाती विभागाच्या सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून पासच्या बाबत तपासणी करण्यात येत आहे.

प्रवेशद्वारासमोर गर्दी

तसेच गुरुवारपासून अपघात विभागात जाण्यासाठी आता केवळ एकाच प्रवेशद्वारचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी अपघात कक्ष जाण्यासाठी दोन ठिकाणांचा गेटचा वापर करण्यात येत होता. मात्र, आता हे गेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रवेशद्वारासमोर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

डॉक्टरच्या मारहाणी नंतर केले बदल

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विकास राठोड यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या वतीने रुग्णाच्या रुग्णाला विचारून त्यांच्या नातेवाईक साठी दोन पास देण्यात येत आहेत. सकाळपासून ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या दोन नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मेडिसिन विभाग आणि अपघात विभाग दोन्ही विभागासमोर वेगवेगळ्या सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच घाटीत डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने खाजगी हॉस्पिटलच्या धरतीवरती पास देण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ही सेवा सुरू केली असली तरी रुगणाला त्याच्या नातेवाईकांना आणि लोकांमध्ये जनजागृती होण्यास आणखी आठवडाभर लागणार असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटेयांनी दिली आहे

बातम्या आणखी आहेत...