आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस ठाण्याच्या जीपचे दोन टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस अंमलदार हे गंभीर जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले. सोयगावहून फर्दापूरला येत असताना फर्दापूर शिवारातील काळा पट्टा शिवारात रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जळगावचे पोलिस अधीक्षक हे आज सकाळी अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी येत असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी सोयगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार व त्यांचे सहकारी चालक पोलिस अंमलदार रवींद्र तायडे हे सोयगाववरून शासकीय कारने (एमएच २० एफवाय ६८९७) फर्दापूरकडे येत हाेते. फर्दापूर शिवारातील काळा पट्टा शिवारात येताच त्यांच्या कारचे डाव्या बाजूचे मागील आणि पुढेचे असे दाेन्ही टायर अचानक फुटले आणि कारने दोन पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला गेली. या अपघातात सपाेनि. अनमोल केदार यांच्या उजव्या हाताला व मानेला जबर मार लागला व चालक पोलिस अंमलदार रवींद्र तायडे यांच्या हाताला मार लागला. दाेन्ही जखमींना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून सपाेनि. अनमोल केदार पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद केली. पुढील तपास पोलिस अंमलदार नीलेश लोखंडे, योगेश कोळी हे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.