आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात, बसची सिग्नलवर उभ्या दुचाकीला जोरदार धडक, एक तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णवाहिका न आल्याने ऑटोतून नेले घाटीत, नागरिक संतप्त

शहरातील सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला आहे. बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. त्याला घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्यानंतर उपस्थित लोकांनी संतप्त होऊन बसच्या काचा फोडल्या आहेत.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला. सिडको बस स्थानकातून बस निघाली होती. दरम्यान सिग्नलवर उभ्या दुचाकीला बसने धडक दिली. बसचा वेग जास्त होता. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला जोरदार धडक बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाचे नाव शुभम शिंदे आहे. त्याला उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णवाहिका न आल्याने ऑटोतून नेले घाटीत, नागरिक संतप्त
अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला उडवल्यानंतर उपस्थित नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी बसच्या काचा फोडल्या. दरम्यान घटनास्थळी लवकर रुग्णवाहिका न आल्याने दोघांनाही ऑटो रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser