आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:कराडजवळ अपघात; उमरगा येथील 2 ऊसतोड मजूर ठार; ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोने धडक दिल्याने अपघात

साताराएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसली

पाचवड फाटा (ता. कराड) येथील पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन ऊसतोड मजूर ठार झाले, तर तीन मजुरांसह टेम्पोचालक असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. शनिवारी रात्री हे अपघात झाले.

राजू रामू राठोड (३५) व खुबा किसन जाधव (४७, दोघेही सध्या रा. वारुंंजी, मूळ रा. आचरी तांदाळ, मुरूम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) अशी मृत मजुरांची नावे आहेत. सूरज केशव राठोड, अमित खुबा जाधव व राम मुन्ना राठोड या तीन मजुरांसह टेम्पोचालक अन्वर पठाण गंभीर जखमी झाले. शनिवारी २० ऊसतोड मजूर वारुंजी (ता. कराड) येथे ट्रॅक्टर (एमएच ५० एल ४३२३) ट्रॉलीमधून निघाले होते. पाचवड फाटा येथे ते आले असता कोल्हापूरकडून गुजरातकडे जाणाऱ्या टेम्पोवरील (जीजे ०६ एझेड ५८९४) चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसली.

बातम्या आणखी आहेत...