आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:छत्रपती संभाजीनगर-जळगाव राज्य महामार्गावर दुचाकीला मालगाडीची धडक, पतीचा मृत्यू; पत्नी जख्मी

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राज्य महामार्गावरील गोळेगाव येथील धोत्रा चौफुलीवर वळण घेत असलेल्या मोटार सायकलला लोडिंग गाडीने धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी व दोन मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.

दिलीप उदयभान जाधव राहणार शेखर तालुका जिल्हा बुलढाणा हे मोटार सायकल वरून उंडणगाव येथून बुलढाण्याकडे जाण्यासाठी औरंगाबाद जळगाव राज्य महामार्गावरील गोळेगावच्या पुढे गेल्यानंतर धोत्रा चौफुली वरून वळण घेत असताना जळगाव कडून छत्रपती संभाजी नगर कडे कडे भरधाव वेगात येणाऱ्या लोडींग गाडीने त्यांना धडक दिली.

यात मोटार सायकल चालक दिलीप उदयभान जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली. या चौफुली जवळ राहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुक्ताराम पाटील गव्हाणे यांनी तात्काळ जखमींना सिल्लोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले या अपघाताची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून अजिंठा पोलीस पुढील तपास करत आहेत.

विहिरीचा दगड पडल्याने मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील गट नंबर 151 मध्ये विहिरीचे काम सुरू असताना विहिरीचा दगड डोक्यात पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दुपारी घडली.

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथून जवळच असलेल्या अनाड येथील गट नंबर 151 च्या शिवारातील शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते.या साठी पाच कामगार विहिरीत काम करण्यासाठी उतरलेले होते. यादरम्यान अचानक विहिरीचा दगड वरून कोसळल्याने कामगार शिवाजी दामोदर हातोळे राहणार मोहोळ (हट्टी) ता. सिल्लोड यांच्या डोक्यात दगड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांचे मार्गदर्शनाखाली अरुण गाडेकर हे करीत आहेत. मयत शिवाजी हातोळे यांचे पश्चात आई, वडील, पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात मोहोळ येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...