आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक येथे पत्नीला भेटण्यासाठी कारने जाणाऱ्या डाॅ. शरद जयराम खेडेकर (रा. बीड बायपास) यांचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात घडला.मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले खेडेकर हे आयुर्वेदिक डाॅक्टर (बीएएमएस) हाेते. क्रांती चाैक परिसरात त्यांचे वरद नावाने हाॅस्पिटल आहे. त्यांच्या पत्नीही डाॅक्टर आहेत. मात्र, काही वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना बँक ऑफ इंडियात नाेकरी लागली. सध्या त्या नाशिक येथे नियुक्त आहेत.
डाॅ. खेडेकर पत्नीला भेटण्यासाठी शनिवारी कारने (एमएच २० एफजी ८७२२) नाशिकला जात होते. नांदगाव शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (आरजे ५१ जीए ०२८४) त्यांच्या कारला समाेरून धडक दिली. यात कारचा चक्काचूर हाेऊन ती रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत डाॅ. खेडेकर यांना कारमधून बाहेर काढले. त्यांच्यावर वैजापूर येथे एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबादला सिटी केअर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दवाखान्यात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला हाेता, असे रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. पांडुरंग वट्टमवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.