आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:आई-वडिलांना भेटण्यासाठी लातूरकडे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हिंगोलीत अपघाती मृत्यू

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील अमरावती ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत कोरूना विषाणू च्या पार्श्वभूमीवर चार महिने बंदोबस्त करून आई-वडिलांना भेटण्यासाठी मूडदड (जि. लातूर) येथे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा हिंगोलीत अपघाती मृत्यू झाला आहे. बुधवारी (22 जुलै) सकाळी आठ वाजता हा अपघात घडला आहे.

हिंगोली शहरातील वळण रस्त्यावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील ओळखपत्राची पाहणी केली असता सदर दुचाकीस्वाराचे नांव हनुमंत विष्णू मुर्टे (वय 27 रा. मुरदड जि. लातूर) असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती पोलिसांनी तातडीने मुर्टे यांच्या कुटूंबियांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान हनुमंत मुर्टे हे तारीख 29 नोव्हेंबर 2018 रोजी अमरावती ग्रामीण पोलिस दलात भरती झाले होते. अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ते पोलिस दलात परिचित होते. मागील चार महिन्यापासून ते कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या बंदोबस्तात होते. चार महिन्यापासून आई-वडिलांची भेट झाली नसल्याने ते मंगळवारी (ता. 21) रात्री 15 दिवसाची अर्जित रजा देऊन दुचाकी वाहनावर गावाकडे निघाले होते. मात्र गावी पोहोचण्यापूर्वीच हिंगोली येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला या घटनेमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलातही शोककळा पसरली आहे.