आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज उद‌्घाटन:अपघाती मृत्यू रोखणे शक्य ; अपघाती मृत्यू रोखणे शक्य

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघातात गंभीर जखमी, मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘टाटा’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तर हा विषय फारच गांभीर्याने घेतला जात आहे. त्यामुळे आता देशभरात सुरक्षित ड्रायव्हिंग व सीटबेल्ट वापरासाठी शासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

याचाच एक भाग म्हणून आता कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज‌ (सीआयआय) या उद्योजकांच्या संघटनेनेही पुढाकार घेऊन १३ ते १८ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचे उद‌्घाटन १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठात होणार आहे. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, आरटीअो संजय मेत्रेवार, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. शिरसाठ यांची उपस्थित राहिल.जगभरातील अपघाती मृत्यूपैकी ९० टक्के प्रमाण हे विकसनशील देशांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. यात एकट्या भारतातील ११ टक्के प्रमाण आहे. हे वाढते अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच दिवस दहा महाविद्यालयांत राबवणार मोहीम
‘सीआयआय’चे चेअरमन प्रसाद कोकीळ व डॉ. सुनील देशपांडे यांनी सांगितले, ‘तरुणवयातच जबाबदार आणि बचावात्मक वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले तर अपघाती मृत्यूवर मात करणे शक्य आहे. याच उद्देशाने सीआयआयच्या वतीने आठ दिवस संरक्षणात्मक ड्रायव्हिंग प्रशिक्षण आयोजित केले आहे. यापैकी पाच दिवस शहरातील १० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहन चालवणे व सुरक्षिततेविषयी प्रशिक्षण दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...