आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटारिपोर्टलचा डिजिटल अहवाल:48 देशांच्या सर्वेक्षणानुसार 95.5% लोक वापरतात चॅट-मेसेजिंग अॅपसाठी इंटरनेट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट; 5 जी युगात भारतात 4 जी चा वेग जगापेक्षा निम्मा 47% लाेक देशात इंटरनेट वापरतात, लोकसंख्येनुसार सर्वाधिक इंटरनेट वापर असलेल्या ४८ देशांत ४७ वा.

-जगातील मोबाइल इंटरनेट कनेक्शनचा सरासरी वेग ३०.३७ एमबीपीएस आहे, जो भारताच्या १४.२८ च्या दुप्पट आहे. -नॉर्वेमध्ये सर्वाधिक १२९.४० एमबीपीएस इंटरनेट स्पीड, व्हेनेझुएलामध्ये सर्वात कमी ४.९८ -जगातील ९२% आणि भारतात ९४% लोक मोबाइलवर इंटरनेट वापरतात. एका वर्षात लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर इंटरनेटचा वापर ८% ने कमी झाला. -इंटरनेटचा सर्वाधिक ६०% वापर माहिती मिळवण्यासाठी केला जाताे. ५५% लोक मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट होण्यासाठी, ५१% व्हिडिओ, टीव्ही आणि चित्रपट पाहण्यासाठी आणि सुमारे ५०% शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी. -सर्वाधिक म्हणजे ९५.५०% लोक चॅट आणि मेसेजिंग अॅप्स वापरतात. ५५% लोक दिशादर्शन व स्थानदर्शक अॅप्स वापरतात. -स्थिर इंटरनेट कनेक्शनचा वेग जगात सरासरी ६५ च्या तुलनेत देशात ४८ एमबीपीएस पर्यंत आहे. -देशातील ७५.५% वेब ट्रॅफिक मोबाइलद्वारे येते.

मोबाइल; इंटरनेटच्या वापरात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर 59% वेळ मोबाइलवर खर्च हाेताे एकूण इंटरनेट वापराच्या तुलनेत, याबाबतीत भारत ४८ देशांमध्ये चौथ्या स्थानी. -जगातील प्रत्येक वापरकर्ता दररोज सरासरी ६:४९ तास इंटरनेटवर घालवतो. देशात ही वेळ ६.५० तास आहे. २०२० च्या तुलनेत ही वेळ ७ मिनिटांनी वाढली आहे. २५ ते ३४ वयोगटातील तरुण लोक दररोज सरासरी ७ तास इंटरनेट वापरतात. -१६-२४ वयोगटातील तरुणी सर्वाधिक म्हणजे राेज सरासरी ७.५४ तास इंटरनेट वापरतात. ५५ ते ६४ वयोगटातील पुरुष दररोज किमान ५:२६ तास इंटरनेट वापरतात. -मोबाइलवर इंटरनेट वापरात महिला पुरुषांपेक्षा पुढे. १६ ते २४ वयोगटात ९३.७% महिला, तर ५५-६४ वयाच्या पुरुषांची संख्या सर्वात कमी ८८.६% आहे. -दैनंदिन इंटरनेट वापरामध्ये मोबाइलचा वाटा एका वर्षात ५२% वरून ५५.५ % पर्यंत वाढला आहे. -जगातील ३८%च्या तुलनेत देशात ४७% लोक महिन्यातून किमान एकदा तरी व्हिडिओ कॉल करतात.

नवीन कल; देशात ९७% लोक आेटीटीवर टीव्ही कंटेंट पाहतात 95% स्त्रिया (१६-२४ वयोगटातील) महिन्यातून किमान एकदा तरी इंटरनेटद्वारे टीव्ही सीरियल्स पाहतात. -जगातील प्रत्येक वापरकर्ता दररोज सरासरी ३:२५ तास टीव्ही पाहतो, जे इंटरनेट वापरत असलेल्या वेळेच्या निम्मा आहे. -देशातील ९७% लोक आेटीटीवर टीव्ही पाहतात. असे करणाऱ्यांमध्ये ५५-६४ वयोगटातील महिला आणि या गटातील पुरुष सर्वात कमी आहेत. -३२% लोक टीव्हीवर इंटरनेट वापरतात. असे करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी ६% ने वाढली आहे. -दर आठवड्याला जगात ३९% लोक इंटरनेटवर संगीत प्लॅटफॉर्मवर गाणी ऐकतात. 22% ऑनलाइन रेडिओ एेकतात आणि २०% ऑडिओ पुस्तकांचा आनंद घेतात. ५१% संगीत व्हिडिओ पाहतात. -देशातील ४९% लोक महिन्यातून एकदा तरी मोबाइलवर क्यूआर कोड वापरतात. ३५-४४ वयोगटातील पुरुष ४९% वापरासह त्यात आघाडीवर आहेत. -गेल्या 2 वर्षांत जगातील स्मार्टवाॅच वापरकर्त्यांमध्ये ६०% वाढ झाली आहे. स्मार्टबँडकडे असलेला कलही 35% पर्यंत वाढली आहे. -देशातील ९२% तर जगात ८२ % लोक व्हिडिओ गेम खेळतात.

चिंता; ३५ टक्के लोकांना भीती ऑनलाइन डेटा चोरीची 31% लोक देशात ऑनलाइन आर्थिक सेवा वापरतात, जागतिक स्तरावर ही सरासरी २९% इतकी कमी आहे. -५५-६४ वयोगटातील सर्वाधिक ३९% लोक ऑनलाइन आर्थिक सेवा वापरतात. तर या श्रेणीतील 39% लोकांना वैयक्तिक डेटा ऑनलाइन चोरीला जाण्याची भीती वाटते, जी उर्वरित लोकांमध्ये सर्वाधिक आहे. -जगातील ३३% लोकांना त्यांच्या ऑनलाइन वैयक्तिक डेटाचा गैरवापर होण्याची भीती वाटते, देशातील ३५% लोक असा विचार करतात. -२५-३४ वयोगटातील केवळ ३०% लोकांना यात धोका वाटताेे, जो उर्वरित श्रेणींमध्ये सर्वात कमी. -जगात १२% लोकांकडे आहेत क्रिप्टोकरन्सी, भारतात १७% कडे. -महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे क्रिप्टोकरन्सीचे आकर्षण. २५ ते ३४ वयोगटातील १८% पुरुषांनी त्यात गुंतवणूक केलेली आहे. -देशातील ३०% लोक रोगांची लक्षणे ऑनलाइन शोधतात. जगात असे करणारे २६% आहेत.

बातम्या आणखी आहेत...