आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाध्यक्ष काळेंची माहिती:काँग्रेस पीक विम्यासाठी अर्ज भरून घेणार, रस्त्यावर आंदोलनही करणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाहीत. त्यामुळे काँग्रेसतर्फे जिल्हा, तालुका पातळीवर पीक विम्याचे शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. हे अर्ज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले जातील. याशिवाय रस्त्यावर उतरून आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी गुरुवारी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत दिली. उद्धवसेनेकडून पीक विम्यासाठी आंदोलन होत असताना काँग्रेसही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. डाॅ. काळे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. त्याबाबत तक्रार करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विमा कंपनीला राज्य व केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या वाट्याचे २५४ कोटी रुपये देण्यात आले. पण नुकसान भरपाई मिळत नाही.

फॉर्ममध्ये भरा खालील माहिती काँग्रेसच्या पीक विमा नमुना अर्जात कोणताही लाभ मिळालेला नाही, अशी माहिती १५ डिसेंबरपर्यंत भरून द्यायची आहे. शेतकऱ्याचे नाव, गाव, शेतीचे क्षेत्रफळ, ज्या पिकांसाठी विमा काढला आहे त्या पिकाचे नाव, विमा कंपनीचे नाव, मोबाइल क्रमांक आणि विमा पावतीची झेरॉक्स सोबत जोडायची आहे.

बातम्या आणखी आहेत...