आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:विद्यापीठ निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप सुरूच ; दोन्ही पॅनलची लढत होण्याची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यात भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनल आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उत्कर्ष पॅनल आमने-सामने आले आहेत. विकास मंचचे पॅनल प्रमुख डॉ. गजानन सानप यांनी उत्कर्ष पॅनलचे मार्गदर्शक तथा आमदार सतीश चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्कर्ष पॅनलचे उमेदवार डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रत्युत्तर दिले असून डॉ. काळेंनी डॉ. सानपांना आव्हान देत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील भाजप-राष्ट्रवादी या बलाढ्य पक्षाचे दोन पॅनल विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या पदवीधर गटातून १० जागांसाठी मैदानात उतरले आहेत. या दोन्ही पॅनलची समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे. उत्कर्ष पॅनलकडून १० जागांसाठी सुमारे २० तर विद्यापीठ विकास मंचाकडून गुरुवारी १० इच्छुकांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. सानप यांनी पत्रकार परिषद घेत विद्यापीठाची निवडणूक यंत्रणा आमदार चव्हाणांच्या दबावतंत्रात काम करत असल्याचा आरोप केला हाेता. या आरोपाला डॉ. काळे यांनी प्रत्युत्तर दिले असून डॉ. सानप यांनी स्वतःवर पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी आमदार चव्हाणांवर बिनबुडाचे आरोप केल्याचे म्हटले आहे. राज्यात स्वतःच्या पक्षाची सत्ता आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण खातेही आहे, असे असतानादेखील विद्यापीठ निवडणूक यंत्रणेवर आमदार चव्हाणांचे दबावतंत्र असल्याचा आरोप हास्यास्पद असून डॉ. सानपांच्या उलट्या बोंबा आहेत. डॉ. सानपांनी पॅव्हेलियनमध्ये न बसता स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...