आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:व्यापाऱ्याची तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक, अहमदाबादमधून आरोपींना केले जेरबंद

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना पोलिसांनी अहमदाबाद येथून आरोपींना केली अटक

जालन्यातील व्यापाऱ्याने अहमदाबाद येथील एका जणाच्या खात्यावर आरटीजीएस करून सौरऊर्जा प्रकल्पाचे साहित्य मागवले होते. परंतु, आरोपीने मोबाइल बंद ठेवून साहित्य न पाठवता ४६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अहमदाबाद येथून तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीयूष दिलीपभाई सोलंकी, प्रतीक दिलीपभाई नाई (अहमदाबाद, राज्य गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत.

जालना शहरातील वसुध भरत भुतेकर (रा. प्रियंका रेसिडेन्सी, मंठा चौफुली, जालना) यांचा सोलार प्रोजेक्ट सेल्स अँड सर्व्हिस असा स्वत:चा सौरऊर्जा उभारणी प्रकल्प आहे. भुतेकर यांनी आरोपींशी डिसेंबर महिन्यात १ लाख ८९ हजार रुपयांचा माल या व्यक्तीकडून मागवला होता. तेव्हा त्यांनी योग्य वेळी डिलिव्हरी दिली होती. यानंतर इतर साहित्य मागवण्यासाठी आरटीजीएसद्वारे ४६ लाखांचे साहित्य मागवले. परंतु यानंतर साहित्य देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तालुका पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला होता. दरम्यान, अहमदाबाद येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपीमध्ये असलेली एक महिला अजूनही फरार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास शेळके, रवींद्र अंभोरे, वसंत धस, कृष्णा भडांगे, चरणसिंग सिंघल, श्याम गोरपल्ले, जयश्री म्हस्के यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...