आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळ राज्यातील मल्लपूरम जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबँकींगचे डिटेल्स यूझर व पासवर्ड हॅक करुन आरोपीने खात्यातून एक लाख 26 हजार 91 रुपये हॅक केले. याप्रकरणी मंजेरी (जि. मल्लपूरम) येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.5) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. केरळच्या सायबर फॉरेन्सीक टिमने दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपी नांदेड येथील ओंकार संजय चातरवाड (रा. कल्याण नगर, नांदेड) असल्याचे निष्पन झाले. त्यानुसार त्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.6) अटक केली.
केरळ राज्यातील मंजेरी (जि. मल्लपूरम) येथील सायबर फॉरेन्सीक टिमने दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सहायक पोलिस निरिक्षक पी.डी. भारती व कर्मचार्यांचे पथक तयार केले. त्यांना सुचना देऊन रवाना केले. आरोपीला पकडण्यासाठी कल्याण नगर येथील त्याच्या घराभोवती पथक अंधारात दबा धरुन बसले होते. दरम्यान, शनिवारी पहाटे आरोपी ओंकार संजय चातरवाड (वय 19) घरी येताच त्याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला मंजेरी (जि. मल्लपूरम) येथील सायबर फॉरेन्सीक टिमच्या स्वाधीन केले.
अनेकांना फसविल्याची शक्यता
आरोपी ओंकार संजय चातरवाड (रा. कल्याण नगर, नांदेड) याच्यासह त्याच्या सहकार्यांनी 12 डिसेंबर 2020 रोजी केरळ राज्यातील मल्लपूरम जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबँकींगचे डिटेल्स यूझर व पासवर्ड हॅक करुन त्यांच्या खात्यातून एक लाख 26 हजार 91 रुपये हॅक केले. या पैशातून त्याने वस्तूंची खरेदी केली. तसेच नंतर खरेदी रद्द करुन सदरील एक लाख 26 हजार 91 रुपये स्वत:च्या खात्यावर वळती करुन काढून घेतले. त्याने असे अनेकांना फसविले असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.