आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. मात्र, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडे याला गुरुवारी जामीन मंजूर केला.
यापूर्वी मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देताना पाच वर्षांसाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. त्यानंतरही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारी आल्यानंतर बनावट डॉक्टर शोध समितीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी मुंडेच्या दवाखान्यावर छापा टाकला होता. तिथे चार रुग्ण उपचार घेताना आढळले होते. तसेच वैद्यकीय उपकरणे व साहित्य सापडले होते. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी फिर्याद दिली होती. या छाप्यावेळी डॉ. सुदाम मुंडे याने सर्व पथकाला धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुंडेला सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड कलम (२) वैद्यकीय व्यवसाय कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाच्या विरोधात आरोपी मुंडेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. या प्रकरणात भादंवि ३५३ लागू होणार नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. हा बचाव ग्राह्य धरून न्या. आर. जी. अवचट यांनी डॉ. सुदाम मुंडेचा जामीन अर्ज मंजूर केला. आरोपी मुंडे याच्या वतीने अॅड. शशिकांत शेकडे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.