आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवे मारण्याची धमकी:लूटमार करणाऱ्या आरोपीस पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावंगी बायपास रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले कारचालक मुसानूर मोहम्मद पटेल यांना लुटून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सोनू ऊर्फ धांदल्या ऊर्फ शेख फेरोज शेख अकबर (३०, रा. बिसमिल्ला कॉलनी, नारेगाव) याला ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी शुक्रवारी दिले. यापूर्वी अटक झालेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

मुसानूर मोहम्मद पटेल (५६) हे रात्री सिडको येथून काम आटोपून कारने घरी परतत होते. लघु शंका आल्याने त्य‍ांनी कार बाजूला थांबवली. ते पुन्हा कारकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने चाकू त्यांच्या गळ्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली होती, तर उर्वरित दोघांनी त्यांच्या खिशातील चार हजार ४०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली होती.