आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मदतीने करायचा चोरी:विविध कंपनीच्‍या 71 हजारांच्या घड्याळ लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिस कोठडी

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील संजय गांधी मार्केट एन-9 येथील न्‍यू भारत वॉच सेंटरवर डल्ला मारत चोरट्यांनी विविध कंपनीच्‍या तब्बल 71 हजार 759 रुपये किमतीच्‍या 101 घड्याळ लंपास केल्‍या होत्‍या. प्रकरणात सिडको पोलिसांनी तपास करून आरोपी सय्यद आकाश राजू बनकर (23, रा. मिसारवाडी) याला गजाआड केले. त्‍याच्‍याकडून 1200 रुपये किमतीच्‍या चार मनगटी घड्याळ जप्‍त करण्‍यात आल्या आहेत. आरोपीला 18 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी गुरुवारी दिले.

हर्सूल येथील उमर कॉलनीत राहणारे सय्यद मकसुद महेबूब जिलानी (41) यांचे गांधी मार्केट एन-9 येथील न्‍यू भारत वॉच सेंटर आहे. 4 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील 71 हजार 759 रुपये किमतीच्‍या भिंतीवरील, टेबल अलार्म व मनगटी अशा सुमारे 101 घड्याळ चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी सय्यद मकसुद यांना दुकानात चोरी झाल्‍याची माहिती कळाली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्यात तपास करुन पोलिसांनी आरोपी आकाश बनकर याला अटक केली. त्‍याने नय्यर ऊर्फ भुर्या (रा. मिसारवाडी) याच्‍या साथीने ही चोरी केल्‍याची कबुली दिली.

तपास सुरू

आरोपीच्‍या साथीदाराला अटक करून गुन्‍ह्यातील उर्वरित ऐवज हस्‍तग करायचा आहे. आरोपीने अशा प्रकारचे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील जरीना दुरर्णी यांनी न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...