आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:25 हजार घेऊनही आरोपी केले; अजून 5 हजार मागणारा फौजदार अटकेत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेच्या पीक घोटाळ्यात ७१ आरोपींव्यतिरिक्त ८ ते १० जणांना ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहआरोपी केले. यात एका चहा विक्रेत्याला पहिले आरोपी न करण्यासाठी उपनिरीक्षक भाऊसाहेब मुरलीधर जमधडे (५७) ने ३० हजार रुपये मागितले. चहा विक्रेत्याने २५ हजार दिले. मात्र, ५ हजार कमी दिले म्हणून आरोपी करून पुन्हा उरलेले ५ हजार रुपये मागितले. पैसे देऊनही आरोपी करून पुन्हा पैसे मागितल्याने संतापलेल्या चहा विक्रेत्याने मात्र थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी सेवानिवृत्तीला अवघे नऊ महिने बाकी असताना जमधडे मात्र लाचेच्या कारवाईमुळे कोठडीत गेला. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज घेतल्याचा घोटाळा २०२१ मध्ये समोर आला होता. यात बँकेतर्फे मुख्य ७१ शेतकऱ्यांना आरोपी करत बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तेव्हापासून जमधडे तपास करत होता. यात तक्रारदाराला सहआरोपीचा ठपका ठेवत पहिले आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपये मागितले. मात्र, पैसे नसल्याने तक्रारदाराने २५ हजार रुपये जमधडेला दिले. परंतु, जमधडेला ५ हजार रुपये कमी दिले म्हणुन पैसे घेऊनही आरोपी करत १८ मे रोजी अटक केली व एका दिवसात जामीन दिला होता.

एसीबीने हॉटेलमध्ये पैसे घेताना रंगेहाथ पकडले, सेवानिवृत्तीला अवघे नऊ महिने बाकी

तक्रारदारास धमक्या, अनेक शेतकरी होते त्रस्त जामिन दिल्याचे उपकार दाखवत जमधडेने तक्रारदाराला तुला, पोलिस काय करु शकतात दाखवतो, कारवाई काय असते हे कळेल, असे धमकावत उर्वरीत ५ हजारांसाठी तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने अखेर एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. डॉ. खाडे यांनी निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांना तपासाचे आदेश दिले. क्षीरसागर यांनी खातरजमा केली असता, जमधडे पैसे मागत असल्याचे निष्पन्न झाले. जमधडेने मंगळवारी बिडकीनला कारने जात ठाण्याजवळील कॅटीनमध्ये तक्रारदाराला ३ हजार घेऊन बोलावले व पैसे स्विकारले. दबा धरुन बसलेल्या क्षीरसागर, अंमलदार राजेंद्र जोशी, रवींद्र काळे, सोमिनाथ शिंदे यांनी जमधडेला रंगेहाथ पकडून अटक केली.

बिडकीन परिसरात जमधडेकडून त्रास पोलिस अधीक्षक कार्यालयात मुळ नियुक्ती वाहतूक विभागातील जमधडे प्रतिनियुक्तीवर आर्थिक गुन्हे शाखेत होता. गुन्ह्यात बँकेने प्रस्तावात ७१ आरोपी दिले होते. मात्र, जमधडेने तपासात नावे समोर आल्याचा ठपका ठेवत आणखी ८ ते १० जणांना सहआरोपी केले. त्यात या तक्रारदाराचा सहभाग होता. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, बिडकीन परिसरात जमधडेने अनेकांना त्रास दिला. त्याच्या धमक्यांना अनेकजण कंटाळल्याचे देखील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...