आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार नवऱ्याला बेड्या:औरंगाबादेत पत्‍नीच्‍या डोक्यात दगड घालून खून; आरोपीला 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद पत्‍नीच्‍या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या नराधम पतीला सातारा पोलिसांनी चिलकनवाडी (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथून बेड्या ठोकल्या. आरोपीला 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमॉ यांनी दिले. मच्छिंद्र पिराजी पिटेकर (55, रा. ह.मु. राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. 5 जूनपासून सातारा पोलिस या मारेकऱ्याच्या शोधात होती. यासाठी तीन पथकेही तैनात करण्यात आली होती.

राहुलनगर भागातील गल्ली नंबर 4 येथे 5 जून रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिल्कीस उर्फ मीना मच्छिंद्र पिटेकर (५०) यांच्या डोक्यात वरंवटा घालून खून केल्याची माहिती मिळाली. साधारणत: 25 वर्षांपूर्वी बिल्कीस बेगम उर्फ मीना हिचा मच्छिंद्र पिटेकर याच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. 4 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान मच्छिंद्र पिटेकर याने बिल्कीस बेगम उर्फ मीना ही घरात झोपलेली असताना, बिल्कीस बेगम हिच्यावर आधी चाकूने वार केले. यानंतर घराबाहेर असलेल्या दगडाचा खलबत्ता (वरवंठा) डोक्यावर मारून खून केला. झोपेतच महिलेचे प्राण गेले. यानंतर मच्छिंद्र पिटेकर याने घराचा दरवाज्याला कुलूप लावून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी हा खून उघडकीस आला. या प्रकरणात बिल्कीस बेगम उर्फ मीना हिची पहिली मुलगी शमा रफिक शेख हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीला 10 जूनपर्यंत कोठडी

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी आरोपीने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहेत. घराला लावलेल्या कुलूपाची चावी हस्‍तगत करायची आहे. गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा नेमका उद्देश काय होता याचा तपास करायचा आहे. तसेच घटनास्‍थळावरुन आरोपीचा मोबाइल सापडला मात्र मयत बिल्कीस बेगम उर्फ मिना हिचा मोबाइल सापडला नाही, त्‍या उद्देशाने आरोपीकडे तपास करायच्या असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...