आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:शिवीगाळ केल्यामुळे आरोपीने चाकूने केले वार; अल्पवयीन गुन्हेगाराचा बायजीपुऱ्यात खून

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यरात्री घराजवळील दुभाजकावर बसलेल्या दोन गुन्हेगारांमध्ये वाद झाल्यानंतर चाकूने सपासप वार करून शेख शाहरुख शेख अन्वर (१७, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री बायजीपुऱ्यातील सिकंदर हॉलसमोर घडली. हैदर खान ऊर्फ शारेख जाफर खान (२५, रा. संजयनगर) असे आरोपीचे नाव आहे.

शाहरुख व हैदर रात्री गप्पा मारत दुभाजकावर बसले होते. तेव्हा शिवीगाळ केल्याने त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात सुरुवात केली. हैदरने कमरेला लावलेला चाकू काढून शाहरुखच्या छाती, पोट, पाठ आणि डाव्या पायाच्या मांडीवर वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. यानंतर हैदर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने शाहरुख नावाच्या तरुणाने आपल्यावर हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले.

उपचारादरम्यान झाला मृत्यू
जिन्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी शाहरुखला घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी हैदरही जखमी झाल्याने त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सोमवारी सकाळी शाहरुखचे मामा पठाण जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरून हैदरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...