आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांजणगाव परिसरात सहा वर्षांपूर्वी खून केलेल्या आरोपीने शहरात खुलेआम गांजा विक्री सुरू केली. परंतु, पोलिसांच्या रडारवर असल्याने त्याने दोन सख्ख्या भावांना किलोमागे ५ हजार रुपये टक्केवारी देऊन गांजाचा पुरवठादार केले. ३१ डिसेंबरला विक्री झाल्यानंतर उरलेला गांजा त्याला परत करण्यासाठी निघालेल्या उमेर खान इक्बाल खान (२८) व अकबर खान इक्बाल खान (२६, दोघेही रा. यासीननगर) यांना गुन्हे शाखेने अटक केली. सय्यद युनूस सय्यद मलिक (रा. चिकलठाणा) याने त्यांना गांजा सांभाळण्यासाठी दिला होता. मात्र, तो कारवाईदरम्यान पोलिसांच्या हातून निसटला.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांना सोमवारी स्कोडा कारमधून गांजा विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानंतर केंब्रिज चाैक ते चिकलठाणा परिसरात सापळा रचला. पोलिसांनी विमानतळ परिसरात कार थांबवून तपासणी केली असता, उमेर व अकबरसोबत २२ किलाे ७०० ग्रॅम गांजा आढळून आला. ही बाब कळताच गांजा पुरवणारा युनूस मात्र पसार झाला. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून, रांजणगाव परिसरात खून केल्याप्रकरणी तो अटकेत होता. ही कारवाई शिंदे यांच्यासह सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे, संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, दत्तात्रय गढेकर, भगवान शिलोटे, विलास मुठे, विशाल पाटील, राजेंद्र चौधरी, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार, तातेराव शिनगारे आदींनी केली.
रेल्वेत प्रवासी बनून करत होते गांजाची तस्करी एनडीपीएस पथकाने नयन रणजित इंद्रेकर (२२, रा. कसाबखेडा फाटा) याला व त्याच्या आईला रेल्वेतून उतरताच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २० किलो ७०० ग्रॅम गांजा आढळला. नयनच्या आईवर यापूर्वी कारवाया केल्या असून, बिदर येथे गांजा विक्री करताना पकडले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते प्रवासी बनून विशाखापट्टणम येथे जाऊन गांजा आणतात. या वेळी चार ते पाच जणांची टोळीच शहरातून गेली होती. त्यात महिलांवर संशय कमी येत असल्याने नयन आईसोबत जात होता. सहायक निरीक्षक सुधीर वाघ, मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, राजराम वाघ, सुनील पवार, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे यांनी कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.