आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:महागड्या 11 सायकली चोरणारा आरोपी अटकेत ; ​​​​​​​पोलिसाच्या खबऱ्याला विकताना सापडला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको परिसरातून महागड्या सायकली चोरून नशेसाठी अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकणारा चोर चरण कल्याण महाले (२९) याला सिडको पोलिसांनी अटक केली. पंधरा दिवसांमध्ये त्याने अकरा सायकली चोरून विकल्या. शेवटची नेमकी पोलिसाच्या खबऱ्याला विकली अन् ताे पोलिसांच्या हाती लागला.

सिडको परिसरातून गेल्या महिनाभरात महागड्या सायकली चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले हाेते. याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना सोमवारी मिसारवाडी परिसरात प्रसिद्ध कंपनीची स्पोर्ट‌्स सायकल अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकण्यासाठी एक जण आल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विकलेल्या ११ सायकली पोलिसांनी जप्त केल्या. सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, शिवाजी भोसले, भीमराव शेवगे, विशाल सोनवणे, किरण काळे यांनी ही कारवाई केली. यापूर्वीही सायकल चोरीत चरणला अनेकदा पकडले हाेते. दरम्यान, सायकल चोरीला गेलेल्या नागरिकांनी सिडको पाेलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...