आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकाऱ्याचा खून:खून करून पाच वर्षे पश्चिम बंगाल, ओडिशात भटकणारा आरोपी अटकेत

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवेळी कंपनीत आल्याचे कारण विचारल्याच्या रागातून सहकाऱ्याचा खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती. त्यातील मारेकरी सोमेश सुधाकर इधाटे (२७, रा. शिरोडी खुर्द, फुलंब्री) हा तेव्हा फरार झाला होता. ताे सोमवारी गावाकडे येणार असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्याला सापळा रचून पाच वर्षांनंतर अटक केली.

वाळूज औद्योगिक परिसरातील श्री इंजिनिअरिंग कंपनीत हा प्रकार घडला होता. तक्रारदार गोपाल काळे, मुकेश साळुंके व विष्णू ढोके, सुरेश इधाटे हे चाैघे त्या दिवशी कंपनीत काम करत होते. त्या वेळी मृत जगदीश प्रल्हाद भराड (३५, रा. बुलडाणा) व मोहन आवचर काम संपवून कंपनीबाहेर पडत होते. मात्र, रात्री ११:३० वाजता तीन वर्षांपूर्वी काम सोडलेल्या सोमेश इधाटे कंपनीत त्यांना दिसला. सुपरवायझर साळुंके त्यांनी त्याला तू इथे कशाला आला? असे विचारले. त्यानंतर गेटवर त्याला मोहननेदेखील विचारून त्याच्यावर प्लास्टिकची नळी उगारली. मात्र, त्याचा राग आल्याने सोमेशने जवळ पडलेले फावडे उचलून जगदीशच्या डोक्यात घातले. यात जगदीशचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

आराेपी पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये करत हाेता काम निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार राहुल बंगाळे यांनी त्याचा शोध सुरू केला. वर्षातून अनेकदा तो गावी लपून येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ताे सोमवारी पुन्हा येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. खून केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये काम करून राहत होता.

बातम्या आणखी आहेत...