आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या भारत जोडोला शुभेच्छा देण्यावरून राम जन्मभूमी अयोध्याचे आचार्य सत्येंद्र दास यांनी घूमजाव केले आहे. ते म्हणाले की, साधू, पुजारी अथवा पंडित जेव्हा त्यांच्याकडे जातात तेव्हा आशीर्वाद देतात. काँग्रेस पक्षाचे लोक आमच्याकडे आले होते व त्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये येण्याची विनंती केली. परंतु आम्ही यात्रेत येऊ शकत नाही असे म्हटल्यानंतर त्यांनी या यात्रेला आशीर्वाद देण्याची विंनती केली. आम्ही त्यांना ही यात्रा सफल होण्यासाठी, मंगलमय होण्यासाठी एक पत्र जारी करत या शुभेच्छा दिल्या.
राजकारणावर काय म्हणाले?
आमच्या शुभेच्छा केवळ भारत जोडो यात्रेसाठी आहेत. यापलीकडे त्यांच्या कोणत्याही विकासाशी नाहीत अथवा कोणत्या कारणांसाठी. ज्या दिवशी ही यात्रा संपेल त्यादिवशी आमच्या शुभेच्छा देखील संपतील. या पत्राचा किंवा शुभेच्छांचा राजकारणाशी काही एक संबंध नाही.
भाजपने आक्षेप घेतला आहे का?
भाजपचा याच्याशी काही एक संबंध नाही. भाजप केवळ त्यांच्याशी संबंधित आहे. अयोध्यामध्ये सध्या राम जन्मभूमीचे उभारली जात आहे तर त्यासाठी भाजपला आमच्या शुभेच्छा आहेत. यासोबतच भाजप पुढे जात असेल तर आमच्या शुभेच्छा असतीलच. भाजप एक सक्षम पक्ष आहे. भाजपचा आम्ही दिलेल्या शुभेच्छांशी काही एक संबंध नाही. त्यांना याची काही एक अडचण नाही. इथे सगळेच लोक आहेत त्यामुळे सर्वांनाच शुभेच्छा असतात.
पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर शुभेच्छा असणार का?
राहुल गांधी उद्या पंतप्रधान बनत असतील तरी आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. आमचा राजकीय आशीर्वाद केवळ भाजपसोबत आहे बाकी कुणासोबत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.