आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्हाइट एलईडी बल्बचे मिळवले ऑस्ट्रेलियन पेटंट; नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या तरुणाने वयाच्या 26 वर्षी मिळवला सन्मान

नांदेड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक लाख तास आयुष्यकाळ असलेल्या व्हाइट एलईडी बल्बचे अाॅस्ट्रेलियन पेटंट हदगाव तालुक्यातील साप्ती या स्मार्ट व्हिलेजमधील शेतकऱ्याचा मुलगा अभिजित रमेशराव कदमच्या नावावर नोंदवले गेले. त्यांना आतापर्यंत २ पेटंटसाठी आंतरराष्ट्रीय अनुदानसुद्धा मिळाले. याआधी ब्ल्यू एलईडीवर सन २०१४ मध्ये जपानचे तीन वैज्ञानिक इशामू अकासकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा यांना विज्ञान विषयातील जगातील सर्वोच्च पुरस्कार “नोबेल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. यांच्याच कार्याला समोर नेत अभिजित यांनी व्हाइट एलईडीसाठी नवीन मटेरियल शोधले आहे आणि त्यावर वयाच्या अवघ्या २६ वर्षी दोन आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अनुदान मिळवले.

व्हाइट एलईडी ही आजच्या महागाईच्या काळात आधुनिक युगात वीज ऊर्जा बचतीसाठी खूप महत्त्वाची प्रकाश व्यवस्था आहे आणि त्याचा जीवनकाळ एक लाख तास आहे. तो सध्या प्रचलित असलेल्या सीएफएल बल्बच्या पाचपट अधिक वीज बचत करून अधिक प्रकाश देतो. या गोष्टीचा सर्वसामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल, अशी माहिती अभिजित कदम यांनी दिली. अभिजित हे नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आपल्या एलईडीच्या संशोधनासाठी जगप्रसिद्ध डॉ. संजय जानराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनखाली आचार्य पदवीचे प्रशिक्षण घेत आहेत.

आचार्य पदवीच्या अवघ्या १८ महिन्यांतच १७ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केले अाहेत. याबरोबरच ७ पेटंट प्रकाशित केले आहेत आणि दोन पेटंटवर अांतरराष्ट्रीय अनुदान मिळवले आहे. अभिजित यांचे १५ बुक चॅप्टर विविध आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्ये प्रकाशनासाठी अभ्यासाधीन असून दोन बुक चॅप्टर नॉवा प्रकाशनच्या अांतरराष्ट्रीय पुस्तकात प्रकाशित झाले आहेत. हदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंडितराव पतंगे, राजेंद्र शिंदे, सुरेश शिंदे, शिवाजीराव शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबुराव कदम कोहळीकर, साप्तीचे सरपंच शिवाजी कदम (महाराज) इत्यादींनी पुढील संशोधनासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

शोधपत्रिकेसाठी गौरव
याअगाेदर अभिजित यांना भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर येथे जानेवारी २०२० मध्ये पार पडलेल्या सेकंड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन रिन्युएबल अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट शोधपत्रिकेसाठी सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...