आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको विठ्ठलनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा ५०० महिलांसह २०० पुरुषांनीही लाभ घेतला. यात हायपर अॅसिडिटीचे ३० रुग्ण, तर संधिवाताचे सर्वाधिक ६० रुग्ण आढळून आले.दत्त जयंतीनिमित्ताने १ तारखेपासून याग सप्ताहाला सुरुवात झाली. सकाळी विठ्ठलनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एकाच वेळी ५०० महिलांच्या उपस्थितीत गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. या वेळी महिलांनी प्रतिसाद देत होमहवनामध्येही सहभाग घेतला. ६ डिसेंबर रोजी रुद्रयाग, मल्हारी याग, तर ७ डिसेंबरला दुपारी १२.३९ वाजता बली पूर्णाहुती, दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे.
आरोग्य शिबिरात मधुमेह, संधिवाताचे रुग्ण सर्वाधिक: विठ्ठलनगर एन-२ श्री स्वामी समर्थ केंद्रात सद्गगुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने गारखेडा, एन-९, शिवाजीनगर, नाईकनगर, छत्रपतीनगर, कन्नड, पीस होम सोसायटी या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले आहे.
दरम्यान, विठ्ठलनगर येथे झालेल्या शिबिरात १०० हून अधिक रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. त्यात हायपर अॅसिडीटीचे ४० रुग्ण, उच्चरक्तदाबाचे ३० रुग्ण, मधुमेहाचे ३० रुग्ण, संधिवातासंबंधी आजाराचे सर्वाधिक ६० रुग्ण, मणक्याच्या आजाराचे १५ रुग्ण आढळून आले. ही तपासणी डॉ. संजय भोसले, डॉ. अंबिका नरवडे यांनी केली. या वेळी रुग्णांना व्यायामाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.