आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३१ डिसेंबरला परवानगी नसताना ढाब्यावर बसून मद्य प्राशन करणाऱ्या ४५ जणांसह २४ ढाबाचालकांवर कारवाई करण्यात आली. यातील ३५ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. मद्यपी व ढाबेचालकांच्या ताब्यातून ६ लाख ८६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक संतोष झगडे व त्यांच्या विशेष पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.