आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाच्या पूर्वसंधेच्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक औरंगाबाद यांनी केलेल्या कारवाईत बीड बायपास परिसरात अवैध ढाबा मालकासह मद्य सेवन करणार्या इसमाविरुद्ध केलेल्या कारवाईत औरंगाबाद न्यायालयाने त्यांना 48,000/- हजारांचा दंड ठोठावीला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच संचालक राज्य उत्पादन शुल्क सुनील चव्हाण व प्रदीप पवार विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 30 रोजी विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक लिलाधार पाटील, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब राख, विजय वरठा, तसेच जवान युवराज गुंजाळ, उस्मान सय्य्द, प्रवीण जाधव, व जवान नि वाहनचालक शैख अशपाक यांच्या पथकाने केली.
सदरची कारवाई बीड बायपास परिसरातील हॉटेल राजदरबार येथे करण्यात आली असून त्यात हॉटेल मालक परमेश्वर भद्गे याच्यासह रवी राजपूत, विवेक पद्मावत, शिवराज कळंबे, कृष्ण शिंदे, शुभम मोरे, विष्णु कापसे, संतोष राजपूत, प्रल्हाद आवटे, कौस्तुभ शहारे असे एकूण 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत न्यायालयाने हॉटेल मालकास रु. 25000 व अन्य 09 आरोपीस रु. 2500 असा एकूण रु. 48000 चा दंड केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.