आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहायक पाेलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी वैजापूर-कोपरगाव मार्गावर अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडले. वाहनांसह देशी विदेशी दारू असा एकूण ४ लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वैजापूर-उक्कडगाव मार्गावर सकाळच्या सुमारास देशी-विदेशी दारूची अवैध मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांचे अंगरक्षक लक्ष्मण पंडित, पोलिस काॅन्स्टेबल रामेश्वर काळे यांना मिळाली होती. संशयित वाहन पोलिसांनी अडवून तपासणी केली असता देशी, विदेशी दारूचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी शुभम काशीनाथ राठोड (रा. कोपरगाव जि. अहमदनगर) याच्या विरोधात अवैध दारूसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.