आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये कारवाई झाली होती. त्या परीक्षा केंद्रांना २०२३ मध्ये परीक्षा केंद्र न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या केंद्रांकडून हमीपत्र घेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्विकारले आहेत. नवीन केंद्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ५४ प्रस्ताव आल्याची माहिती सहसचिव प्रियाराणी पाटील यांनी दिली. दहावी-बारावी २०२२ च्या परीक्षेत निलजगाव येथील लक्ष्मीबाई टिळक, गेवराई तांडा येथील स्वप्नपूर्ती कॉलेज येथे परीक्षेदरम्यान विद्यार्थी मंडप, गोडावूनमध्ये बसलवल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या कॉलेजचा बोर्ड संकेतांक गोठवला होता. परंतु, विद्यार्थी हित लक्षात घेवून शिक्षण विभागाने मान्यता पूर्ववत केली. शिवाय बोर्डाने देखील संकेतांक खुला केला आहे. मात्र, या संस्थांना परीक्षा केंद्र देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
औरंगाबाद तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात संशोधन व नवनिर्मितीला प्रचंड संधी आहे. यासाठी तरुण संशोधकांच्या वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, असे मत परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार’ महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. मुस्तजीब खान, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.