आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानायलॉन मांजा विक्रीची औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वीच बारा जिल्ह्यांच्या पोलिसांना स्वतंत्र पथक स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारच्या सुनावणीत शहर व जिल्हा पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन करून नागरिकांनी मांजा विक्रीची माहिती देण्याचे निर्देश दिले. आता नायलॉन मांजा विक्रेत्यांसह मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. संबंधितांची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशावरून शहरात मांजा विक्रीवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव व उपनिरीक्षक अजित दगडखैर हे या पथकाचे प्रमुख असतील. नागरिकांनी दगडखैर (९३०७०९३००४) तसेच नियंत्रण कक्षाच्या ०२४०-२२४०५०० क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातही पथक : पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना केली. नागरिकांनी ११२ तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क साधून मांजा विक्रीची माहिती द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.