आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:वर्गोन्नतीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पाहता यंदा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नती देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, अनेक खासगी शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत ऑनलाईन परीक्षा तसेच तत्सम उपक्रम घेणे सुरु केले होते. ही बाब निदर्शनास आल्यावर नियमांचे उलंघन करणाऱ्या शाळांवर आता कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी व अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला बहुतांश इंग्रजी शाळांनी केराची टोपली दाखवत सर्रासपणे परीक्षा घेण्यास सुरुवात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आरटीई अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नतीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे आदेश दिले होते. शासनाच्या या निर्णयाचे शिक्षक, पालकांकडून स्वागत करण्यात आले होते. मात्र, खासगी इंग्रजी शाळांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता.

या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पहिली ते नववीच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीचा फायदा घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट देण्यास सुरुवात केली होती. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे शासनाने आता नियमांचे उलंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. असेही जयस्वाल यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...